शेतकऱ्यांसाठी सनी निम्हण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 5,55,555 लाखांची मदत

0
19

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्त



पुणे, ता. २९ : मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठीसोमेश्वर फाउंडेशनआणिसनीज फूड्सयांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सुपूर्त केला.

सोमेश्वर फाउंडेशनआणिसनीज फूड्सयांच्या वतीने दरवर्षी सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. हजारो नागरिक हा फराळ विकत घेतात आणिना नफा, ना तोटाया तत्वावर जनसामान्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचे भाग्य निम्हण परिवाराला लाभते.

या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा संकल्प निम्हण परिवाराने केला होता. या आवाहनाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरला.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सनी विनायक निम्हण यांनी धनादेश सुपूर्त केला. या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आणिसोमेश्वर फाउंडेशनच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.

 

البحث
الأقسام
إقرأ المزيد
Sports
FIFA World Cup 2026 Martinez Silent on Ronaldo and Portugal
Portugal’s national football team is edging closer to qualification for the FIFA World Cup...
بواسطة FIFA 2026 Tickets 2025-11-11 07:08:08 0 15
أخرى
Fun Indoor Activities for Kids
Keeping kids engaged indoors can sometimes feel like a challenge, but with the right activities,...
بواسطة The Alifa 2025-11-08 07:41:23 0 20
أخرى
E-Commerce SEO Strategies to Grow Online Stores in Coimbatore
The e-commerce industry in Coimbatore is booming — from fashion boutiques and electronic...
بواسطة AdMedia Coimbatore 2025-11-08 07:56:02 0 24
أخرى
Drone Logistics Market Analysis – Growth & Forecast
Drone logistics and transportation is an emerging field that leverages unmanned aerial vehicles...
بواسطة Akshaya Suresh 2025-10-30 06:21:19 0 9
أخرى
Digital Printing for Packaging Market Surges with Increasing Demand for Customization and Sustainability
"What’s Fueling Executive Summary Digital Printing for Packaging Market...
بواسطة Rahul Rangwa 2025-10-31 06:36:12 0 20